Whatsapp

About

आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि जनमानसात "भाऊ" या नावाने सुपरिचित असणारे सचिन साठे हे पिंपरी चिंचवड मधील भूमीपुत्रांमधून पुढे आलेल्या नेतृत्वांपैकी एक आघाडीचे नाव आहे . सचिन साठे यांचे चुलते तथा थोर स्वातंत्र्यसैनिक कै.भाऊसाहेब साठे यांचा जनसामान्यांच्या सेवेचा आणि राष्ट्रभक्तीचा वारसा सचिन साठे खऱ्या अर्थाने पुढे चालवत आहेत.

महनमंगल अश्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट १९७३ रोजी पवित्र मुळा नदीच्या किनारी वसलेले पिंपळे निलख याठिकाणी सचिन साठे यांचा जन्म झाला. घरातील स्वातंत्र्यलढ्याचा वारसा आणि भाऊंचा स्वातंत्र्यदिनी झालेला जन्म हा जणू दुग्धशर्करा योगायोगच म्हणावा.

आपले प्राथमिक शिक्षण पिंपळे निलख येथे तर, माध्यमिक शिक्षण शिवाजीनगर, पुणे येथील भारत इंग्लिश स्कूल मध्ये पूर्ण करून, श्री.सचिन साठे यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध अश्या फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश मिळवला.

Read More

Latest Work

प्रभाग क्र. २६ – आपल्या भागाचे भौगोलिक व सामाजिक महत्त्व पुणे व पिंपरी-चिंचवडला जोडणारा दुवा, संरक्षण विभागाची जवळीक आणि मुंबई–बंगळोर महामार्गाला लागून असलेले स्थान यामुळे आपल्या प्रभागाचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. हिंजवडी आयटी पार्क, ऑटोमोबाईल व चाकण–भोसरी औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कुटुंबांची प्रथम पसंती हा प्रभाग – हीच आपली ताकद! आपल्या भागात सर्व स्तरांतील नागरिकांचे स्नेहपूर्वक सहजीवन आहे. पुढील २५ वर्षांच्या दृष्टीने वाढणारा निवासी व व्यावसायिक विस्तार लक्षात घेता पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, उद्याने, भाजी मंडई आणि इतर मूलभूत सुविधांचे सुयोग्य नियोजन हीच माझी प्राथमिकता आहे. प्रत्येक नागरिकाच्या गरजा समजून प्रभागाचा संतुलित व शाश्वत विकास साधणे — हेच माझे ध्येय.

सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित “न्यू होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा” हा भव्य कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि त्यांच्या कलागुणांच्या झळाळीमुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने संस्मरणीय ठरला. या कार्यक्रमाला मा. आमदार सौ. अश्विनीताई लक्ष्मण जगताप, मा. नगरसेविका सौ. मोनिकाताई मुरलीधर मोहोळ आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. स्वप्ना शत्रुघ्न काटे या मान्यवर उपस्थित राहिल्या आणि महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन दिले. मला आनंद आहे की या स्पर्धेत अनेक महिलांनी आपले कौशल्य, आत्मविश्वास आणि उत्साह दाखवत अप्रतिम सादरीकरण केले.

सचिन साठे सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित “दिवाळी पहाट – फराळ” हा सुरेल आणि आनंदमय कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने स्वरधारा म्युझिकल ग्रुप तर्फे सादर करण्यात आलेल्या हिंदी–मराठी गीतांच्या सुरेल मैफलीने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. संगीत, स्नेह आणि उत्साहाने सजलेल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमाने वातावरण आनंदमय केले. चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार, मा.श्री. शंकरभाऊ जगताप यांनी उपस्थित राहून कलाकारांचे कौतुक केले तसेच सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी परिसरातील नागरिक बंधू भगिनी , जेष्ठ नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More
Follow

FACEBOOK

Follow

X

Follow

INSTAGRAM